मुख्य बातमी
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भरगच्च कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, सकाळी ९ वाजता स्वामी पादुकावर अभिषेक, दुपारी १२ वाजता प्रदक्षिणा, १२.३० वाजता आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घघ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.



