मुख्य बातमी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

मंदिरात दुग्ध अभिषेक तर गरजू मुलांना धान्यवाटप

रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आणि शिवसैनिकांचे आराध्य दैवत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत लाडक्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या अभिमानाने साजरा केला.

दिवसाची सुरुवात धार्मिक अनुष्ठानाने झाली. उद्धवजी ठाकरे यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, यासाठी श्री देव काशी विश्वेश्वर मंदिरात शिवसेनेच्या वतीने जाहीर दुग्ध अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी ठाकरे साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे साकडे घातले.

सामाजिक उपक्रमांचाच एक भाग म्हणून शिवाजी नगर येथील आयटी.आय. लिंक रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी शिवसैनिकांनी या भागात विविध वृक्षांची लागवड केली, तसेच या झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्पही केला.

वाढदिवसाचे मुख्य आकर्षण शहरालगत असणाऱ्या ‘आशादीप’ संस्थेमध्ये पाहायला मिळाले. येथील मुलांना दैनंदिन जीवनात लागणारे आवश्यक धान्य आणि गोडधोड (मिष्टान्न) वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. शिवसैनिकांच्या या उपक्रमामुळे संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.

या सर्व स्तुत्य कार्यक्रमांना शिवसेना तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, किरण तोडणकर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे आणि विभागप्रमुख राजन शेटे, संदेश भिसे, राजाराम रहाटे, सिद्धेश्वर कोळी, तन्वीर मुजावर, पारस खानविलकर, अभय गुरव, सचिन सावंत देसाई, योगेश कोरगावकर, सर्फराज शेख तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंदार वारेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सायली पवार, तालुका संघटक ममता जोशी, मिताली पवार, सौ. पवार, शहर संघटक सेजल बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावर, ज्येष्ठ पत्रकार व लेखिका मेघना कोल्हटकर, प्रतिमा साळुंखे आणि स्मिताली नार्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्री. परमार, श्री. काटीकर आणि श्री. बिजापुरी यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या सर्व सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!