मुख्य बातमी

शेतकरी कर्जमुक्तीसाठी ५,२३७ जणांची यादी जिल्हा मध्यवर्तीला बँकेला प्राप्त

कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त्ती २०२६ या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची ५,२३७ शेतकऱ्यांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिम्हवणेकर यांनी केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७ हजार ३३३ शेतकरी या योजनेसाठी पात्र असून पहिल्या टप्प्यात ५ हजार २३७शेतकऱ्यांची यादी बँकेला २४ जुलै रोजी प्राप्त झाली आहे. ही पात्र शेतकऱ्यांची यादी ही संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालय, बँक शाखा कार्यालय तसेच गावपातळीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ मिळणेसाठी पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र/सीएससी’ येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!