रत्नागिरी येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : सनातन संस्थेतर्फे उद्या (२९ जुलै) गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या पवित्र पर्वानिमित्त गुरुपूजन, रामराज्यासाठी सामूहिक नामजप, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके तसेच “रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ४ ते ६ या वेळेत अंबर सभागृह, टी. आर. पी., रत्नागिरी येथे होणार असून, अध्यात्मप्रेमी, धर्माभिमानी आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत अध्यात्म, साधना आणि संस्कार यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


