Uncategorized
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ ऑगस्ट रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात होणार आहे.
लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात.



