मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ज्येष्ठ कबड्डीपटू अशोक शिंदे यांचा सन्मान

चिपळूण : प्रसिद्ध कबड्डी समालोचक तथा भारतीय रेल्वे कबड्डी संघाचे प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई तसेच दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ कबड्डीपटू पेढांबे गावचे सुपुत्र अशोक नारायणराव शिंदे यांचा त्यांच्या मुंबई निवासस्थानी नुकताच सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

कबड्डी क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. शिंदे यांचा हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या क्रीडा कारकिर्दीने अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा दिली असून, कबड्डी क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.

या सन्मान सोहळ्यास शंकर शिंदे तसेच सुधाकर कदम उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री. शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!