मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कळमुंडीत मोलकरणीसह साथीदाराकडून साडेपाच लाखांची घरफोडी

सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास : चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल

चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून, घरातील मोलकरणीने साथीदाराच्या मदतीने ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुयोग संतोष बेलवलकर (वय ३०, व्यवसाय – हॉटेल, रा. हनुमानवाडी, कळमुंडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ३१ जुलै रोजी सकाळी ५ ते १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०४ या कालावधीत घर बंद असल्याची संधी साधून आरोपींनी घराच्या दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

चोरीस गेलेल्या ऐवजात मंगळसूत्र, कानातील दागिने, सोन्याची चेन, ब्रेसलेट, पेंडंट, अंगठ्या, सोन्याची नाणी, नथ, सोन्याचे मणी तसेच १८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे.

या प्रकरणी मोलकरणीसह गणेश काशिराम गोरीवले (वय ३१, रा. कळमुंडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!