मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

भोस्ते घाटात टँकरचा अपघात; चालक सुखरूप 

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर टँकर उलटल्याची घटना काल (१८ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. हा टँकर लोटे औद्योगिक वसाहतीतून मुंबईच्या दिशेने जात असताना महामार्गावरील भोस्ते घाटात हा अपघात झाला.

या अपघातात टँकरच्या पाठीमागील टाकी रस्त्याच्या लगत असलेल्या दरीत कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. परंतु या अपघातात टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तीव्र उतार आणि अवघड वळण यामुळे वाहनाच्या वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने हा अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे. या अपघाताची खेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!