मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वाकेड घाटात स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ऑरा कारने घेतला पेट; जीवितहानी टळली

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात उभ्या असलेल्या ऑरा कारला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. त्यानंतर ऑरा कारने पेट घेतल्याने ‘बर्निंग कार’चा थरार पाहायला मिळाला. हा अपघात आज (१९ सप्टेंबर) सकाळी ७ च्या सुमारास घडला असून, यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी ऑरा कार (एमएच-४८-जीक्यू-३५५७) अपघातामुळे महामार्गाच्या कडेला उभी होती. त्याचवेळी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारने (एमएच-४७-बीटी-८००६) उभ्या असलेल्या ऑरा कारला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर ऑरा कारने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बेचिराख झाली.

दरम्यान, अपघातानंतर वाहनातील प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारळकर, पोलीस अंमलदार नासिर नावळेकर, स्वप्नील कदम, विलास जाधव आणि सचिन बळीप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्ग पोलिस देखील हजर झाले.राजापूर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या जवानांनीही तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून ऑरा कारला लागलेली आग आटोक्यात आणली.

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!