मुख्य बातमी

युवा मोर्चा शहराध्यक्षपदी अजिंक्य केसरकर यांची नियुक्ती

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी अजिंक्य महादेव केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष द. रत्नागिरी प्रशांत यादव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, रत्नागिरीत शहर चिटणीस निलेश आखाडे, युवा मोर्चा जिल्हासरचिटणीस संकेत कदम, नितीन जाधव, राजू तोडणकर, भक्ती दळी, तसेच पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते केसरकर यांचा सत्कार करण्यात आला आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी अजिंक्य केसरकर यांची नियुक्ती जाहीर केली. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना अजिंक्य केसरकर म्हणाले, “पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी वरिष्ठ नेतृत्वाचा मनापासून आभारी आहे. युवा मोर्चा शहराध्यक्ष म्हणून संघटन अधिक बळकट करण्यासाठी, युवकांना पक्षाच्या विचारांशी आणि सामाजिक कार्याशी जोडण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर माझा भर असेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन.”

कार्यक्रमात महसूल मंत्री बावनकुळे यांनी युवकांनी संघटनाबरोबरच समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच नव्या पदाधिकाऱ्यांना आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे शहरातील युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!