मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आनंद जाधव राष्ट्रीय सामाजिक विकास दूत पुरस्काराने सन्मानित

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र आणि शिव – प्रभा या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांना पुणे येथे “राष्ट्रीय सामाजिक विकास दूत पुरस्कार -२०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आयोजित आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मान्यवरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रभक्ती परिवार, वसुधैव कुटुम्बकम् जन सेवा फाउंडेशन, विजेता मीडिया आणि सायबर भारत न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. यामध्ये देश आणि राज्य पातळीवर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व आदर्श कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून समाजातील विविध स्तरांतील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने भूषण सुने (राष्ट्रीय सदस्य – क्राईम ब्रेन्स अँड इंटेलिजन्स कौन्सिल), भारती तुपे (प्रदेशाध्यक्षा – राष्ट्रभक्ती महिला संघटना), सुभाष डेनकर (नगरसेवक – लोणावळा नगरपरिषद), अश्विनी पाटील (अध्यक्षा – वसुधैव कुटुम्बकम् जन सेवा फाउंडेशन), गणपत गायकवाड (तालुका अध्यक्ष – रिपाई), राजेंद्र पवार (अध्यक्ष – राष्ट्रीय समाज पक्ष, पुणे शहर), पांडुरंग पिसे (आदर्श सरपंच), ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे, किशोर थोरात (राज्यअध्यक्ष – सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ), अनिता वाघमारे (माजी सभापती – जालना), अशोक बेलापुरकर (८४ वर्षीय सायकलपटू), संदीप बापू रासकर सर (उत्कृष्ट निवेदक व कवी) आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बापू रासकर यांनी केले. या संपूर्ण सन्मान सोहळ्याचे नेटके आणि देखणे व्यवस्थापन विजेता मीडियाने केले. देशसेवेचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत आयोजित केलेल्या या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. शेवटी राष्ट्रभक्ती परिवार व वसुधैव कुटुम्बकम् जन सेवा फाउंडेशनच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!