मुख्य बातमी
प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना (PMSS) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी सैनिकांच्या पात्र पाल्यांनी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ असून, त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.



