राजकीय पक्षांच्या बैठकीत मतदान केंद्र सुसूत्रीकरणाची माहिती

रत्नागिरी : मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थित आज झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण या विषयी माहिती देण्यात आली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पाच विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रातील प्रस्तावित बदलांच्या तपशीलामध्ये प्रसिद्ध यादीनुसार होणाऱ्या मतदान केंद्राच्या संख्येत कोणताही बदल नाही. १३०० पेक्षा जास्त मतदार होत असल्यास दुसरे मतदान केंद्र करणे अथवा कमी मतदार केंद्रात समायोजन करणे असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.
यानुसार दापोली मतदारसंघात १६७ पंढरी या मतदान केंद्रातील तुरेआळी हा विभाग काढून १६५ पंढरी या केंद्राला जोडण्यात आलेला आहे. १७१ हर्णै मतदान केंद्रातून क्रिश्चनआळी, बौद्धवाडी हे दोन विभाग काढून १७४ हर्णै या मतदान केंद्राला जोडण्यात आले आहेत. १५६ वणौशी तर्फे नातू या मतदान केंद्राला जोडलेले सर्व मतदार व मतदार क्षेत्र हे सोंडेघर या महसुली गावातील असल्याने १५६ या केंद्रास सोंडेघर हे नाव देण्यात येत आहे.
चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये जुनी इमारत मोडकळीस आल्याने मतदान केंद्राच्या स्थळात बदल करण्यात आला आहे. यात ९ पेढे कोष्टेवाडी, १३९ शिरगाव, १४० शिरगाव, २४८ कसबा. जुन्या इमारतीची शाळा बंद झाल्याने २१-तिवडी तर सध्याच्या मतदार संघाचे अंतर लांब असल्याने ९४-खडपोली हे मतदान केंद्र आहे.
रत्नागिरी इमारत निर्लेखित झाल्यामुळे मतदान केंद्र स्थळास बदल झाला आहे. मतदान केंद्राचे नाव रत्नागिरी नगरपालिका वॉर्ड क्र. ८, रत्नागिरी नगरपालिका वॉर्ड क्र.९.
राजापूर इमारत निर्लेखीत झाल्यामुळे ३२९ प्रिंदावन मतदान केंद्र स्थळात बदल झाला आहे.
या बैठकीला प्रशांत साळुंखे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), राजाराम रहाटे (ठाकरे शिवसेना) सुफियान जयगडकर (ठाकरे शिवसेना), सनीफरखान गवाणकर (राष्ट्रवादी काँग्रेस पाटी- शरद पवार) राहुल पंडित (शिवसेना), दिलावर गोदड (ठाकरे शिवसेना), प्रशांत सुर्वे (ठाकरे शिवसेना), ओंकार फडके (भारतीय जनता पार्टी), खलील वस्ता (आम आदमी पार्टी) सलील डाकवे (ठाकरे शिवसेना) उपस्थित होते.


