करबुडे (रत्नागिरी) येथे रुग्णवाहिका अनावरण सोहळा उत्साहात

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सह्याद्री फाउंडेशन करबुडे यांच्या विद्यमाने रुग्णवाहिका अनावरण सोहळा संजय कदम तसेच सज्जन लाड, शिव सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद उर्फ पप्पू शितप, उपाध्यक्ष सुरेश कारकर, महेश महादेव रामगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी राजू पाचकुडे, विक्रम शितप, श्रीकांत आग्रे, विशाल शितप, शिवाजी सोनवडकर, नंदकुमार पाचकुडे, संजय कळंबटे, राजा साळवी, बंटी खापरे, संदीप नेवरेकर, मंगेश साळवी, बबन पाचपुडे, अनिल आग्रे, विलास सोनवडकर, किशोर सोनवडकर, सुरेश रामगडे, संतोष मायंगडे, सुरेश रामगडे, सुनील रामगडे, संतोष रामगडे, महादेव पाचकुडे, महेश घाणेकर (देऊड), प्रमोद धनावडे, विकास धनावडे, गंगाराम नेवरेकर, सुरेश पाचकुडे, महेश पाचकुडे, अमित शितप, प्रकाश गोताड, सचिन सोनवडकर, कैलास खेडेकर, बाब्या साळवी, कृष्णा रामगडे (खालगाव) तसेच खालगाव करबुडे जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व महिला मंडळ ज्येष्ठ शिवसैनिक युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

