विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांसाठी विविध कर्ज योजना; जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : विमुक्त जाती, भटक्या जमाती (VJNT), इतर मागास प्रवर्गातील (OBC) उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासनातर्फे विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे.
महामंडळाच्या वतीने थेट कर्ज योजना (रु. १ लाखापर्यंत थेट कर्ज), बीज भांडवल कर्ज योजना (२५ टक्के बीज भांडवल कर्ज), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. १० लाखांपर्यंतची कर्ज मर्यादा), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १० लाख ते जास्तीत जास्त रु. ५० लाखांपर्यंतची कर्ज मर्यादा) या प्रमुख कर्ज योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना तसेच आपला व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
योजनांविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, पाटबंधारे स्टॉप, कुवारबाव, जिल्हा रत्नागिरी – ४१५६३९ अथवा राहुल सुखदेव नरवडे (मोबाईल क्रमांक: ९९२३१९२४१४) यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यालयीन दूरध्वनी: ०२३५२-२३००६३
ई-मेल आयडी: vjntratnagiri@gmail.com
अधिकृत संकेतस्थळ: www.vjnt.org
पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधून या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.


