मुख्य बातमी

खेडमधील ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलला; नवीन तारीख लवकरच

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे खेड तालुक्यातील भरणे येथे १२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. या मेळाव्याची नवीन तारीख आणि ठिकाण यथावकाश जाहीर करण्यात येईल.

जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवक-युवतींसाठी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत तु. बा. कदम महाविद्यालय आर्टस, सायन्स अँड कॉमर्स (बालाजी हॉटेलमागे, भरणे, ता. खेड, जि. रत्नागिरी) येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही प्रशासकीय कारणांमुळे हा मेळावा नियोजित तारखेला होणार नाही.

या रोजगार मेळाव्याची नवीन तारीख व ठिकाण लवकरच संबंधितांना कळविण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व रोजगार इच्छुक युवक आणि युवतींनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त द. दी. चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!