मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात होणार आहे.

लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठविणे आवश्यक राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!