क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रबर बॉल क्रिकेटमध्ये राजकोजी रेवाळेवाडी आंगवलीचा डंका; हिरादेवी ११ चषकाचे मानकरी

संगमेश्वर : मार्लेश्वर पंचक्रोशी मर्यादित अंतर्गत श्री. हिरादेवी ११, निवधे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत राजकोजी रेवाळेवाडी आंगवली क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. श्री. हिरादेवी क्रिकेट क्लब, निवधे ‘ब’ संघ उपविजेता ठरला.

उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर राजकोजी रेवाळेवाडी आंगवली संघाने हिरादेवी ११ चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत पंचक्रोशीतील तब्बल १६ संघांनी सहभाग घेतला होता. उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत राजकोजी रेवाळेवाडी आंगवली संघाने सुरुवातीपासूनच आपल्या खेळाची छाप पाडत अंतिम सामन्यापर्यंत दमदार वाटचाल केली. आई शिंब्रादेवी क्रिकेट संघ, ओझरे संघाने तृतीय, तर श्री. हिरादेवी ११, निवधे संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.

वैयक्तिक पारितोषिकांमध्येही राजकोजी रेवाळेवाडीने आपली छाप सोडली. यात मॅन ऑफ द सिरीजचा किताब शुभम कुळ्ये (राजकोजी रेवाळेवाडी) याने पटकावला. बेस्ट बॅट्समन म्हणून श्री. हिरादेवी क्रिकेट क्लब, निवधे ‘ब’ संघाच्या आकाश गुरव यांची निवड करण्यात आली. बेस्ट बॉलर म्हणून राजकोजी रेवाळेवाडीच्या प्रणव रेवाळे यांना, तर बेस्ट फिल्डर म्हणून मयुरेश पवार (हातिव ११) यांना गौरवण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभलेल्या प्रसाद सावंत, राजेश गुरव, संतोष बेंद्रे, केशव गुरव, प्रभाकर गुरव, प्रवीण कोळापटे, तसेच शिवसाई दत्तगुरु क्रिकेट संघ, परचुरी-डाफळेवाडी, गुहागर आणि मार्लेश्वर पंचक्रोशी मुंबई समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आयोजकांनी आभार मानले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १६ संघांचे कर्णधार व खेळाडू आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या श्री. हिरादेवी ११, निवधे संघाच्या सर्व सदस्यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

सर्वांच्या सहकार्यामुळे, एकजुटीमुळे आणि खिलाडूवृत्तीमुळे ही स्पर्धा उत्साहात व यशस्वीपणे पार पडली. विजेत्या राजकोजी रेवाळेवाडी आंगवली संघासह सर्व पारितोषिक विजेते आणि सहभागी १६ संघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!