नेपाळ येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी मदतीसाठी दिलेल्या लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी केले आहे.
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:
माहिती नोंदवण्यासाठी लिंक :
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी – 02352-222233
मोबाईल – 7057222233


