मुख्य बातमी

नारळी पौर्णिमेनिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते समुद्राला नारळ अर्पण

रत्नागिरी : नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरातील मांडवी येथे समुद्राला नारळ अर्पण करत मनोभावे प्रार्थना केली.

रत्नागिरीच्या अथांग सागरी किनाऱ्यावर सागरदेवतेला मनोभावे श्रीफळ अर्पण करून विधिवत पूजन करत सागरदेवतेच्या कृपेने सर्व कोळी बांधवांचे जीवन सुख, शांती आणि भरभराटीने उजळून निघो, अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली.

याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!