मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात कोकणातील पहिली राज्यस्तरीय परिषद 

चिपळूण : इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ सप्टेंबर रोजी कोकण विभागातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद ‘महा-मायक्रो कॉन २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेत देशभरातील नामवंत मायक्रोबायोलॉजी तज्ञ व प्राध्यापक सहभागी होणार असून संसर्गजन्य आजारांचे निदान, कोविड -१९, एचआयव्ही, मलेरिया, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स तसेच फंगल इन्फेक्शन्स यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

परिषदेत विविध मान्यवर वक्ते आपले मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये क्षयरोग, मलेरिया नियंत्रण, वन हेल्थ, उदयोन्मुख बुरशीजन्य संसर्ग, रेबीज, व्हायरल हिपॅटायटीस, कोविड- १९ चे नवीन व्हेरियंट्स, अँटीमायक्रोबियल स्ट्यूवर्डशिप आणि एचआयव्ही निदान यांसारख्या विषयांचा समावेश आहे.

या परिषदेला सुमारे २५० प्रतिनिधी, १५ वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे ९० पीजी विद्यार्थी, नर्सिंग स्टाफ व वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार असून या सर्वांना अद्ययावत वैद्यकीय ज्ञानाचा लाभ मिळणार आहे.

ही परिषद मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. योगेंद्र शेळके, डॉ. वनिता कुलकर्णी, डॉ. मीना रामतीर्थकर आणि वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, कॉलेज समन्वयक डॉ. नेताजी पाटील यांच्या अथक प्रयत्नने साकार होत आहे आणि संबंधित मायक्रो विभागाच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात येत आहे.

‘महा-मायक्रो कॉन २०२६’ ही परिषद भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

रत्नागिरी शासकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, मुख्य अध्यापक डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप देखील उपस्थितीत राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!