मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे ‘जन आरोग्य समिती’ची सभा उत्साहात संपन्न

आरोग्य सेवा अधिक गतिमान करण्याचा निर्धार

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे ‘जन आरोग्य समिती’ची आढावा बैठक जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. या बैठकीत आबलोली कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवा, उपकेंद्रांचे कामकाज, स्वच्छता व पोषण अभियान तसेच रुग्णकल्याण विषयक विविध विकासकामांवर विस्तृत चर्चा करण्यात येऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यावेळी समिती सह-अध्यक्ष तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. पी. जांगीड, सदस्य सचिव तथा प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक पांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच समिती पदाधिकारी व द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल मोहिते, आरोग्य सहाय्यक नेहा गुहागरकर, ग्रामपंचायत आरोग्य उपसमिती सभापती ऋषिकेश बाईत, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी श्री. साळवी, स्थानिक स्वराज्य संस्था व विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी, आरोग्य उपकेंद्र स्तरावरील जन आरोग्य समितीचे प्रतिनिधी म्हणून सरपंच व प्रशासक उपस्थित होते. यामध्ये अरुण पेजले (सरपंच, पाली), प्रगती मोहिते (सरपंच, कोतळूक), विजय धोपट (सरपंच, शीर), अनिल मोरे (प्रशासक, पिंपर), प्रतीक जाधव, युवा प्रतिनिधी संदेश काजरोळकर, निमंत्रित सदस्य म्हणून वैष्णवी नेटके (सरपंच निर्मल ग्रामपंचायत आबलोली), ॲड. प्रतीक पवार (सरपंच, खोडदे), ॲड. प्रमेय आर्यमाने, प्रकाश भोजने (सरपंच, मासू), मंगेश मते, सुरेखा पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार व तत्पर आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी नेत्रा ठाकूर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!