रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आजचे रक्तदाते रुग्णांना नवीन जीवनदान देतील, हेच राजेंद्र आयरेंना जयंतीदिनी रक्तदान सर्वश्रेष्ठ ठरेल : मिलिंद कीर

रत्नागिरी : “आज राजेंद्र आयरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या अचानक निधनाने जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्याची वेळ आपल्यावर आली ही दुःखदायक गोष्ट आहे, आयरे हे चळवळीतील आदर्शवत नेतृत्व आपणास अजुन हवे होते त्यांच्या समवेत काम करताना खुप प्रेरणा मिळाली, त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी आणि अजरामर ठरेल,आज त्यांच्या जयंतीदिनी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यामुळे रुग्णांना नवीन जीवनदान मिळेल हेच खरे श्रेष्ठदान ठरेल, असे मनोगत रत्नागिरी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष मिलींद किर यांनी व्यक्त केले.”
बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रदेश सचिव राजेंद्र आयरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात येते, आयरे साहेबांच्या अचानक निधनामुळे जयंती निमित्त रक्तदान शिबिर शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत आयोजित करण्यात आले होते.
रक्तदात्यांनी खूप उत्स्फूर्तपणे चांगले सहकार्य केले, रक्तदान शिबीर प्रसंगी रत्नागिरी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष मिलींद किर, तैलिक समाज सेवा संघांचे तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुकाध्यक्ष रत्नदिप कांबळे, थिबा राजा कालीन संघर्ष समितीचे जेष्ठ धडाडीचे कार्यकर्ते दिवेन कांबळे, ॲड. प्रवीण कांबळे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्र प्रभारी अनिकेत पवार, बसपा रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, प्रभारी किशोर पवार, उपाध्यक्ष अनंत पवार, कोषाध्यक्ष दीपक आयरे, सचिव राकेश पवार, वाटद सेक्टरचे सुहास पवार, चांदेराई सेक्टरचे दीपक कांबळे, अशोक नगरचे महेश कांबळे, कल्पेश हातखंबेकर, मोहीते अँब्युलेन्स सर्व्हीसचे किशोर मोहीते उपस्थित होते.
शासकीय रक्तपेढीचे डॉ. सूरज निकम, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी मधुरा भोसले, डॉ. स्नेहा भोसले, इनचार्ज सुवर्णा जोशी, टेक्निशियन भारती भोसले, परिचारिका जयश्री कुंडलकर आणि दीप्ती जाधव, थूळ या सर्व स्टाफचे चांगले सहकार्य मिळाले.



