क्रीडामहाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत शिवशंभो मर्दानी आखाडा यांची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई : रुरेल पोलीस हेडक्वार्टर टेक नाका याठिकाणी लाठी इंडियाच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी राज्य लाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी शिव शंभो मर्दानी आखाडा महाराष्ट्र राज्य संचलित दिवंगत महादेव व्यायाम शाळा या संस्थेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले.

संस्थेचे खेळाडू, मुले हर्ष कडू, नैतिक गार्दीया, दक्ष नाईक, आर्यन मोरे, दिवित पाटील, मार्तंड महाडिक, प्रथमेश कडुकर, विराट, तोरसकर, मुली आराध्या सातोस्कर्, संस्कृती कदम, रिद्धी नाईक, नम्रता तोरसकर, अरगीणी मोरे, गार्गी मोरे, अविष्का महाडिक, माई मकवाना, ओवी नार्वेकर, जान्हवी कदम, जयश्री नार्वेकर, या खेळाडूंनी सहभाग घेऊन एकम् लाठी व द्वे लाठी मध्ये प्रथम क्रमांकावर विजय मिळवून सुवर्ण पदक व रौप्य पदकाचे मानकरी ठरले. तसेच या स्पर्धेसाठी अथर्व सुधीर कांबळे व विश्वनाथ सुभाष नाईक यांनी पंच पदाची यशस्वी अशी कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!