मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्पुटर सेंटरच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील माध्यमिक विद्यालय तसेच एक्सलंड अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक डिजिटल “स्किल्स, अल टूल्स, डिजिटल इमपावर्मेंट फॉर टीचर्स”या कोर्सविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

आजच्या डिजिटल युगात शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुयश कॉम्पुटर सेंटरच्या वतीने संचालक संदेश साळवी, संचालिका सौ. सावी साळवी यांच्या यांनी शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी सावंत, सलोनी मोहिते, सिद्धी डिंगणकर, साक्षी आंबेरकर, शुभम सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!