टेरवच्या रूपेश कदम यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचा बहुमान

चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव, राधाकृष्णवाडीचे सुपुत्र रूपेश राधेश्यामराव कदम यांना शिवसेना पक्षाच्या वतीने मुंबई विमानतळावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्याचा बहुमान लाभला.
देशाच्या पंतप्रधानांचे प्रत्यक्ष स्वागत करण्याची संधी मिळणे ही निश्चितच रूपेश कदम यांच्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण श्री क्षेत्र टेरव गावासाठी अभिमानाची आणि अविस्मरणीय बाब ठरली आहे. या विशेष प्रसंगामुळे टेरवच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या या महत्त्वपूर्ण संधीबद्दल रूपेश कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला मिळालेली ही दखल त्यांच्या आगामी वाटचालीस निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. रूपेश यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस टेरवासीयांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.



