पेवे खरेकोंड गावचे सुपुत्र, कीर्तनकार हभप सचिन साळवी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

आबलोली (संदेश कदम) : संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण व संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील पेवे खरेकोंड गावचे सुपुत्र, कीर्तनकार हभप सचिन महादेव साळवी यांना प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खेर्डी (ता. चिपळूण) येथील संत शिरोमणी गोरोबा काका सभागृहात आयोजित कार्यक्रमात चिपळूण तालुका कुंभार समाज अध्यक्ष प्रकाश निवळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हभप सचिन साळवी यांनी ते श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर (श्री क्षेत्र पंढरपूर, आळंदी) या फडाचे वारकरी असून गेली चौवीस वर्ष कीर्तन, भजन, प्रवचन क्षेत्रात सेवा करत असल्याचे सांगितले. कोकण तसेच घाटमाथा परिसरामध्ये त्यांनी कीर्तन, प्रवचन सेवा केली असून, सन्मान हा केवळ शाल -पुष्पाचा नसतो तो आपल्या सेवेची मिळालेली प्रेमळ पोचपावती असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रकाश निवळकर यांच्या हस्ते माझा झालेला हा सन्मान आमच्यासाठी केवळ कौतुकाचा क्षण नाही, तर आधिक निष्ठेने, आधिक ताकदीने, आधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी शेवटी ते सांगितले.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सतीश दरेकर, रमाकांत क्षीरसागर उपस्थित होते. तसेच डॉ.सुरेश काळे, पुंडलिक सोनावणे, वसंतराव कुंभार, अण्णा राहुकर, वसंतराव धोडनदीकर, सत्यवान वाळके, अंनत महाडकर, सुरेश बोरस, महेश सायकर, भरत शिरसाठ, अंनत कुंभार, प्रकाश भालेराव, रामदास कुंभार, विलास गुडकर, भानुदास गोर्डेकर, भास्कर कल्याणकर, दीपक शिरकर, वासुदेव साळवी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थितहोते.



