मुख्य बातमी

भारतीय जनता पार्टी आयोजित गणेश सजावट स्पर्धा उत्साहात संपन्न; विजेत्यांचा गौरव

रत्नागिरी : कोकणच्या गणेशोत्सवाला सजावटीची किनार लावणाऱ्या आणि दरवर्षी उत्सुकता असणाऱ्या गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी च्या वतीने या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांचा मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. भक्ती मनोर दळी आणि शहर सरचिटणीस श्री. निलेश महादेव आखाडे यांच्या वतीने रत्नागिरी शहर प्रभाग क्र. ६ व ७ साठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यंदा स्पर्धेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक सजावट, कोकणी वाडा, किल्ले, आणि पौराणिक देखावे अशा विविध थीमवर साकारलेल्या आकर्षक सजावटींनी परीक्षकांची मने जिंकली. स्पर्धकांनी पाठवलेल्या फोटो आणि व्हिडिओच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे

प्रथम क्रमांक : सुधाकर सीताराम कर्लेकर

थीम : जंगलातील गुहा आणि धबधबा.. (कर्लेकर वाडी, रत्नागिरी)

द्वितीय क्रमांक : अनिश विजय पेडणेकर (विश्वनगर, रत्नागिरी)

थीम : गरुडा वर बैसोनी माझा कैवारी आला.

तृतीय क्रमांक : श्रेयस मयेकर

थीम : राजापूर येथील धृतपापेश्वर मंदिर देखावा.

 

उत्तेजनार्थ :

अनिरुद्ध लेले (राजेंद्र नगर ) : नारळाच्या झापापासून करण्यात आलेली सजावट.

सोहम गोडबोले (अभ्युदय नगर ) : विष्णू अवतार सागर देखावा.

सायली कर्लेकर (कर्लेकर वाडी ) : केदारेश्वर गुहेची प्रतिकृती.

राजेश भारती (आंबेशेत रत्नागिरी ) : आई महालक्ष्मी मूर्ती प्रतिकृती देखावा.

या सर्व विजेत्यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून आरती संग्रह, सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजकांसह, महिला मोर्चा सरचिटणीस प्रज्ञा टाकळे, शहर उपाध्यक्ष संतोष सावंत, शहर सरचिटणीस नगरसेवक संदीप सुर्वे, विक्रम जैन, सौ. सायली बेर्डे, शहर उपाध्यक्ष शैलेश बेर्डे, सौ. निधी निलेश आखाडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस नपुरा मुळ्ये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेने कोकणच्या गणेशोत्सवाची शोभा वाढवली, त्याबद्दल आयोजक भक्ती दळी आणि निलेश आखाडे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!