जयगडचे तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल कांबळे यांचा सत्कार

रत्नागिरी : ग्रामपंचायत जयगड महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल बाळू कांबळे यांचा सत्कार १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या वाटद- खंडाळा (ता. रत्नागिरी) येथील संपर्क कार्यालयात करण्यात आला.
रत्नागिरी तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख तथा रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तसेच मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा पाणंद समितीचे (रत्नागिरी तालुका) अध्यक्ष श्री. प्रसाद उर्फ बाबू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात अशा प्रकारचा सत्कार सोहळा आयोजित करून श्री. कांबळे यांना गौरविण्यात आले. बाबू पाटील आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन श्री. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख अभय खेडेकर, शरद चव्हाण, आप्पासाहेब धनावडे, बाबय कल्याणकर, सौ. उषा सावंत (मा.जिल्हा परिषद सदस्या), सौ.अनुष्का खेडेकर (मा.पंचायत समिती सदस्या), सौ. मेघना पाष्टे (माजी सभापती पंचायत समिती, रत्नागिरी तथा विभाग प्रमुख महिला आघाडी) ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद घाटगे, अनिरुद्ध साळवी (माजी सरपंच जयगड) विभाग संघटक अनिकेत सुर्वे, नंदू बेंद्रे, संदीप शिरधनकर, युवासेना विभागप्रमुख पार्थ उर्फ बाबा पाटील तसेच जयगडचे शिवसैनिक शौकत डांगे, फारूक संसारे, सौ. समीरा संसारे, सौ.अक्षदा देवरुखकर, सौ. फर्जाना डांगे (माजी सरपंच) कमलाकर बोरकर, दिलीप राऊत आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. कांबळे यांना भावी वाटचालीसाठी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जयगडमध्ये सामाजिक सलोखा, शांतता, एकता, बंधुभाव टिकून वृद्धिंगत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



