मुख्य बातमी

कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

रत्नागिरी : येथील कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त ‘स्वच्छता मोहिमेने’ अभिवादन करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिसर स्वच्छता करून झाली. या मोहिमेत सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. ऐवळे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि बालवाडी विभागातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुर्वे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केला. महात्मा गांधींचे आवडते भजन विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सामूहिकरित्या म्हटले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित सुंदर भाषणे केली. प्रमुख वक्त्या सौ. बंडागळे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ऐवळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये लालबहादूर शास्त्रींनी कठीण काळात देशाचे खणखर नेतृत्व करून, अन्नधान्य तुटवडा आणि सुरक्षितेच्या आघाडीवर भारताला स्वावलंबी बनवले याचे विस्तृत कथन केले. कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी संस्कृतिक प्रमुख श्री. वेदरे, सौ. मेस्त्री आणि सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गार्डी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!