मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

महार रेजिमेंट दिनानिमित्त सुभेदार भाऊ पवार यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

आबलोली (संदेश कदम) : महार रेजिमेंट दिन आणि यशसिद्धी माजी सैनिक संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चवदार तळे क्रांतीभूमी, महाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते यशसिद्धी माजी सैनिक संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुभेदार भाऊ पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुभेदार भाऊ पवार वयाच्या १९व्या वर्षी, सन १९७० मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी सहभाग घेतला. सैन्यातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग ठेवत माजी सैनिक आणि समाजासाठी योगदान दिले आहे.त्यांच्या प्रदीर्घ देशसेवा आणि सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी यशसिद्धी माजी सैनिक संघाचे माजी अध्यक्ष मेजर सुभेदार दत्ताराम मोहिते, उपाध्यक्ष हवालदार चंद्रकांत कदम, हवालदार प्रभाकर जाधव, मोतीराम मोहिते, सरचिटणीस हवालदार अशोक सावंत, सचिव हवालदार संजय तांबे, कोषाध्यक्ष हवालदार अनंत तांबे, ज्येष्ठ सल्लागार हवालदार शांताराम सावंत, सदस्य हवालदार राजेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!