मुख्य बातमी

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळपसडा येथे भजनाचा जंगी सामना 

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळपसडा येथे भजनाचा जंगी सामना

 

गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील साळवी नगर गोळपसडा येथे दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ येथे भजनांचा जंगी सामना आयोजन करण्यात आला आहे. आज (१३ ऑक्टोबर) रात्री १०.३० वाजता भजनाचा जंगी सामना बुवा संदीप लोके (मु. लिंगडाळ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) विरुद्ध बुवा श्रीकांत शिरसाट (मु. बडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) यांच्यात रंगणार आहे.

१४ ऑक्टोबर रात्री ९.३० वाजता दांडियारास, १५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, रात्री ९.३० वाजता दांडियारास, १६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोंधळ जोगवा मागण्याचा कार्यक्रम, ७.३० वाजता दिवटी नाचण्याचा कार्यक्रम, रात्री १० वाजता गोंधळाची कथा, १७ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महिलांचे हळदी-कुंकू, ६ वाजता होममिस्टर स्पर्धा, रात्री ९.३० वाजता दांडियारास, १८ रोजी सकाळी १० वाजता होमहवन व कुवारी पुजन, रात्री १० वाजता डान्स स्पर्धा (५ ते २० वयोगट), रात्री ११ वाजता दांडियारास, १९ रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता बक्षीस वितरण, ११ वाजता शक्ती तुऱ्याचा जंगी सामना. तुरेवाले शाहीर विशाल निकम (केतकी, चिपळूण, रत्नागिरी) विरुद्ध शक्तीवाले शाहीर वैदेही शेलार (ता. खेड) यांच्यात जंगी सामना. २० रोजी सायंकाळी ५.३० वाजता दसरानिमित्त मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम, रात्री .९.३० वाजता दांडियारास आणि २१ रोजी दुपारी ३.३० वाजता आरती व गाऱ्हाणे, सायंकाळी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणुकीने नवरात्रोत्सवाची सांगता होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!