गुजरात येथील लाठीकाठी स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंचे यश
रत्नागिरीतील खेळाडूंचाही समावेश

गुजरात : लाठी इंडियाच्या वतीने ११ ऑक्टोबर २०२६ रोजी कोली समाज हाॅल दमन वापी याठिकाणी लाठी इंडिया असोसिएशन (गुजरात) यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मिरा भाईंदर, मुंबई, सब- मुंबई, रायगड, धाराशिव, पुणे, पिंपरी चिंचवड, रत्नागिरी, गोवा येथील लाठी जिल्हा असोसिएशनच्या एकूण २०० खेळाडूंनी सहभाग घेतला. मिरा भाईंदर जिल्हा लाठी असोसिएशन महाराष्ट्र राज्य शिव शंभो मर्दानी आखाडा महाराष्ट्र राज्य संचलित दिवंगत महादेव व्यायाम शाळा या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एकूण १९ खेळाडूंनी सहभाग घेऊन एकम् आणि द्वे लाठी प्रथम क्रमांकावर विजय मिळविला.
मुले वयोगट : दीवित पाटील – एकम् लाठी (सुवर्ण पदक). द्वे लाठी (कांस्यपदक). दियांश दाभोलकर – एकम् लाठी – (रौप्य पदक), द्वे लाठी – (कांस्यपदक), दक्ष नाईक – एकम् लाठी ( रौप्य पदक) द्वे लाठी – (कांस्यपदक), हर्ष कडू – एकम् लाठी (सुवर्ण पदक) द्वे लाठी – (सुवर्णपदक), सौमिल मेस्त्री – एकम् लाठी (सुवर्ण पदक), द्वे लाठी (कांस्यपदक). नैतिक गार्दीया- एकम् लाठी ( सुवर्ण पदक), द्वे लाठी ( कांस्यपदक). प्रथमेश कडुकर – एकम् लाठी ( सुवर्ण पदक), द्वे लाठी (रौप्य पदक). संदीप दाभोलकर – एकम् लाठी (सुवर्ण पदक) द्वे लाठी (कांस्यपदक).
मुली वयोगट : संस्कृती कदम – एकम् लाठी (सुवर्ण पदक) द्वे लाठी (सुवर्णपदक). वेदीका पवार – एकम् लाठी (सुवर्ण पदक) द्वे लाठी (कांस्यपदक). श्रेया भोवाळ – एकम् लाठी ( रौप्य पदक), द्वे लाठी ( कांस्यपदक). आराध्या शिंदे – एकम् लाठी (सुवर्ण पदक) ,द्वे लाठी (सुवर्णपदक). रुतू धावडे – एकम् लाठी (सुवर्ण पदक), द्वे लाठी ( सुवर्ण पदक). रिद्धी नाईक – एकम् लाठी – (रौप्य पदक), द्वे लाठी (कांस्यपदक). गार्गी मोरे – एकम् लाठी (रौप्यपदक), द्वे लाठी (कांस्यपदक). संस्कृती संतोष कदम – एकम् लाठी (रौप्यपदक) द्वे लाठी ( रौप्यपदक). विधी तळेकर – एकम् लाठी (सुवर्ण पदक), द्वे लाठी (कांस्यपदक). मायका यादव – एकम् लाठी ( कांस्यपदक), द्वे लाठी (कांस्यपदक). नम्रता कडूकर – एकम् लाठी (सुवर्ण पदक) द्वे लाठी रौप्य पदक.
तसेच झालेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी विश्वनाथ सुभाष नाईक व अथर्व सुधीर कांबळे यांनी पंच पदाची उत्तम जबाबदारी पार पाडली. १ जानेवारी २०२७ रोजी इंडोनेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी शिव शंभो मर्दानी आखाडा महाराष्ट्र राज्य संचलित दिवंगत महादेव व्यायाम शाळा या संस्थेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


