मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सेवा संकल्प अभियानाअंतर्गत गुहागरमध्ये आयोजित रांगोळी स्पर्धेत शुभ्रा घाणेकरचा द्वितीय क्रमांक

सेवा संकल्प अभियानाअंतर्गत गुहागरमध्ये आयोजित रांगोळी स्पर्धेत शुभ्रा घाणेकरचा द्वितीय क्रमां

 

आबलोली (संदेश कदम) : संपूर्ण राज्यात सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत असून, सेवा संकल्प अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या गुहागर तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत शुभ्रा मोहन घाणेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ – तांबडवाडी या शाळेतील इयत्ता सातवीमधील विद्यार्थिनी शुभ्रा मोहन घाणेकर हिने “विकसित भारताची चित्रमय कथा” या विषयावर आधारित रांगोळी साकारली. या रांगोळीला गुहागर तालुक्यातून द्वितीय क्रमांक देण्यात आला असून, गुहागरचे उपसभापती निलेश सुर्वे, गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, गटशिक्षणाधिकारी गळवे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शुभ्रा मोहन घाणेकर हिचा प्रशस्तीपत्रक देऊन तिला सन्मानित केले. शुभ्रा घाणेकर हिने मिळवलेल्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा कमिटी, वाडी प्रमुख, केंद्रप्रमुख, शिक्षक वृंद, ग्रामस्थांनी शुभ्रा हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!