मुख्य बातमी

कोकण नमन कलामंच‘ची नवीन कार्यकारणी जाहीर!

रत्नागिरी : कोकणाची लोककला आणि सांस्कृतिक परंपरा जपणाऱया ‘कोकण नमन कलामंच, रत्नागिरी या संस्थेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी प्रभाकर (पी. टी.) कांबळे यांची तर कार्याध्यक्षपदी श्रीधर सोनू खापरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

‘कोकण नमन कलामंच, रत्नागिरी या २०२६ वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीत एकूण २७ जणांचा समावेश आहे. या नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे लोककला क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या उपाध्यक्षपदी अरुण कळंबटे आणि हरिश्चंद्र बंडबे यांची निवड झाली आहे. सचिवपदाची धुरा विश्वनाथ गावडे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सहसचिव म्हणून सुनील खापरे काम पाहणार आहेत. खजिनदारपदी सुनील लोगडे, तर सहखजिनदारपदी अशोक सांबरे यांची निवड झाली आहे. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदी एकूण १६ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सुरेश सोनू होरंबे, विलास कृष्णा भातडे, दीपक पांडुरंग किंजळे, रमेश गुणाजी मालप, विजय नामदेव माचिवले, संजय गणपत पाष्टे, विश्वास विठ्ठल दसम, राकेश रामचंद्र घाणेकर, सचिन बाळू काष्टे, योगेश लक्ष्मण डांगे, संजय गोविंद सोलिम, सुनील वासुदेव वीर, संतोष मानकू तांबे, दिनेश दत्ताराम गुरव, नंदकिशोर शंकर आग्रे आणि संजय रत्ना चंदरकर यांचा समावेश आहे.

संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख विजय पाडावे आणि सहप्रसिद्धीप्रमुख म्हणून रोहित माचिवले तसेच संपर्कप्रमुख म्हणून संतोष यशवंत धनावडे यांची निवड झाली. कोकणातील नमन आणि लोककलेला नवीन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त केला जात असून सर्व नूतन पदाधिकारी व सदस्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!