मुख्य बातमी

१३६ पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना), पर्यावरण महार येथे माजी सैनिकांसाठी भरतीचे आयोजन

पुणे आणि साताऱ्यात पार पडणार प्रक्रिया

रत्नागिरी : सशस्त्र दलातील माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEF & CC) व राज्य वन विभागातील पात्र माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी १३६ पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना), पर्यावरण महार येथे भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

या भरती प्रक्रियेसाठी सशस्त्र दलातील माजी सैनिक किंवा राज्य वन विभागामध्ये किमान २० वर्षे सेवा बजावलेल्या माजी महिला कर्मचारी पात्र असतील.

उमेदवारांसाठी वयाची कोणतीही किमान मर्यादा निश्चित केलेली नाही; मात्र संबंधित उमेदवारांची सेवामुक्ती किंवा निवृत्ती होऊन भरतीच्या तारखेपासून ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला नसावा (निवृत्तीनंतर ५ वर्षांच्या आत नोंदणी आवश्यक).

भरतीचे ठिकाण आणि वेळापत्रक :

ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाणार असून, उमेदवारांनी नमूद दिवशी सकाळी ५ वाजल्यापासून उपस्थित राहणे आवश्यक आहे.

टप्पा क्रमांक १ (पुणे) :

स्थळ: भगत पॅव्हेलियन, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर (BEG), खडकी, पुणे

दिनांक: १८ ते २१ ऑक्टोबर २०२६

टप्पा क्रमांक २ (सातारा) :

स्थळ : सातारा सैनिक स्कूल, सदर बाजार, सातारा

दिनांक: २४ ते २७ ऑक्टोबर २०२६

भरतीसंदर्भातील सविस्तर नियम व अधिक माहितीसाठी संबंधितांनी 9168168136 या अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!