मुख्य बातमी
मेर्वी गुरववाडी शाळेत दांडिया उत्साहात

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी शाळेत सरस्वती पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक मसरज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या नंतर मुलांनी दांडीया नृत्य सादर केले.
अंगणवाडी व शाळेतील सर्व मुलांनी अतिशय आनंदी वातावरणात मुलांनी दांडी नृत्यचा ठेका धरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका सौ. शाहानाज भाटकर व अंगणवाडी सेविका सौ. सत्येश्री खर्डे, मदतनीस सौ. स्नेहल कुरतडकर तसेच पालक आणि ग्रामस्थ, व्यवस्थापन समितीचे चांगले सहकार्य लाभले.



