जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब योजनेसाठी नोव्हेंबर २०२६ चा अन्नधान्य कोटा मंजूर
१० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार लाभ

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब योजनेतील (PHH) लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर २०२६ या महिन्याकरिता अन्नधान्य वितरणाचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी एकूण २,४१६ मेट्रिक टन तांदूळ आणि १,६३८.२५ मेट्रिक टन गहू असा कोटा मंजूर करण्यात आला असून, जिल्ह्यातील १० लाख २ हजार ८०० नोंदणीकृत लाभार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन वाघ यांनी दिली.
शासकीय नियमांनुसार प्रत्येक पात्र लाभार्थ्याला प्रतिमहिना ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू असे एकूण ५ किलो धान्य वितरित केले जाणार आहे.
गोदामनिहाय लाभार्थी आणि धान्य वाटपाचा तपशील – मंडणगड : ४०,७१३ लाभार्थ्यांसाठी ७० मेट्रिक टन तांदूळ व ५५.५० मेट्रिक टन गहू.
दापोली : १,१८,८०१ लाभार्थ्यांसाठी २१० मेट्रिक टन तांदूळ व १५०.५० मेट्रिक टन गहू.
खेड : १,१३,६०२ लाभार्थ्यांसाठी ३२५ मेट्रिक टन तांदूळ व २१७ मेट्रिक टन गहू.
गुहागर : ७४,०७५ लाभार्थ्यांसाठी १८० मेट्रिक टन तांदूळ व १२५.२५ मेट्रिक टन गहू.
चिपळूण : १,४९,५३८ लाभार्थ्यांसाठी ४११ मेट्रिक टन तांदूळ व २७६ मेट्रिक टन गहू.
संगमेश्वर : ६८,८४५ लाभार्थ्यांसाठी १०२ मेट्रिक टन तांदूळ व ७४ मेट्रिक टन गहू.
देवरूख : ५५,७९६ लाभार्थ्यांसाठी १५०.५० मेट्रिक टन तांदूळ व १०० मेट्रिक टन गहू.
रत्नागिरी : १,६१,७७० लाभार्थ्यांसाठी ४०७ मेट्रिक टन तांदूळ व २७६.५० मेट्रिक टन गहू.
जयगड : ३१,३९४ लाभार्थ्यांसाठी ६८.५० मेट्रिक टन तांदूळ व ४६ मेट्रिक टन गहू.
पाली : १५,८२५ लाभार्थ्यांसाठी ४७ मेट्रिक टन तांदूळ व ३१.५० मेट्रिक टन गहू.
लांजा : ६५,७३० लाभार्थ्यांसाठी १८४ मेट्रिक टन तांदूळ व ११३ मेट्रिक टन गहू.
राजापूर : ८४,२३७ लाभार्थ्यांसाठी २१० मेट्रिक टन तांदूळ व १४० मेट्रिक टन गहू.
पाचल : २२,४७४ लाभार्थ्यांसाठी ५१ मेट्रिक टन तांदूळ व ३३ मेट्रिक टन गहू.
रास्त भाव दुकानांना (रा.धा. दुकान) धान्य मंजूर करताना शासनाच्या दि. १८ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती उचित कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हा पुरवठा प्रशासनाने दिले आहेत.



