मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” कार्यशाळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : पंचायत समिती गुहागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” ही कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अपूर्वा बारगोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यार्थ प्रकाश बळवंत, पंचायत समिती सदस्य आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर तालुका अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांनी प्रस्तावना मांडली. अभियान संदर्भात सादरीकरण केले. अभियानाचे उद्दिष्ट, ध्येय, सर्व विभागांचे सक्रिय सहभाग, जबाबदारी, कृती दल समिती, पुरस्कार,अभियान अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र मूल्यांकन सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती उपस्थित सर्व सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विकास अधिकारी याचबरोबर पंचायत समिती विविध विभागाचे खाते प्रमुख यांना दिली. या कार्यशाळेला तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक बहुसंख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सचिन चौगुले, अक्षय गावडे, राजेश जाधव, श्रीमती श्रद्धा पवार, श्रीमती पूजा ससाणे यांच्यासह पंचायत समिती आणि तालुका आरोग्य विभागातील स्त्री परिचर आणि पुरुष परिचर यांनी विशेष मेहनत घेतली. सुरेश आमटे यांनी सर्वांच्या आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!