राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दि. १ जुलै २०२५.
राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिलेल्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करून १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करणे १४ ऑक्टोबर २०२५.
राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारूप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्याचा दि. ६ नोव्हेंबर २०२५.
प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दि. १४ नोव्हेंबर.
प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे – दि. २८ नोव्हेंबर.
मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे- दि. ४ डिसेंबर २०२५.
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे – दि. १० डिसेंबर २०२५.



