राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजविरोधात निषेधात्मक काळी दिवाळी

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचे आदेश व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार महायुती सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धुळपेक करून शेतकऱ्यांना जी फसवी मदत दिलेली आहे त्याचा निषेध म्हणून रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादीतर्फे ‘काळी दिवाळी’ साजरी केली जात आहे.
फसव्या पॅकेजचा निषेध म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करताना राज्यात सरसकट कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी. ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी आग्रहाची मागणी निवेदनामार्फत करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांसाठी मुद्देशीर कार्यतत्परतेने अन्याय विरोधात आवाज उठवताना पुढे येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेकडून समाधान व कौतुक करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष बारक्या शेट बने, जिल्हा सरचिटणीस रणजीत शिर्के, युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, शहराध्यक्ष नीलेश भोसले, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संकेत कदम, वरिष्ठ नगरसेवक बबन आंबेकर, जिल्हा युवक सरचिटणीस मतीन बावांनी, अल्पसंख्याक महिला शहराध्यक्ष सौ. फरजाना मस्तान, सनीप गव्हाणकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



