सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती साजरी

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेल्या झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात १५ ऑक्टोबर रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून आणि उपस्थितांकडून अभिवादन करून करण्यात आले. डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य आणि कशाप्रकारे अपयशातून यशाची पायरी गाठली याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी रायगड येथील करंजा हार्बर मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष (एफएफपीओ) हेमंत गौरीकर उपस्थित होते. संशोधन केंद्रातील अधिकारी प्रा. डॉ. ए. यु. पागरकर, अभिरक्षक डॉ. एच. बी. धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. एन. डी. चोगले व प्रा. एस. बी. साटम, जीवशास्त्रज्ञ श्रीम. व्ही. आर. सदावर्ते व श्रीम. ए. एन. सावंत, कार्यालय अधीक्षक एस. तांबे, व.प्रयोगशाळा सहाय्यक श्री. आर. एम. सावर्डेकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.



