मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाची जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केली पाहणी

रत्नागिरी : जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी बुधवारी (५ नोव्हेंबर) मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाची पाहणी केली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देतानाच त्यांनी समस्याही जाणून घेतल्या.

यावेळी राजापूर प्रांताधिकारी डॉ. जस्मीन, रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार प्रियांका ढोले, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. कुलकर्णी, उपअभियंता कौशिक रहाटे, अनिल पाटील, प्रकल्प व्यवस्थापक प्रेमकुमार आदी उपस्थित होते.

रत्नागिरीतील कुवारबाव, आकाशवाणी, हातखंबा, पाली पूल, लांजा, कुडू , कुरणे आदी ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषत्वाने भेट देऊन पाहणी करत लवकरात-लवकर काम सुरू करण्याबाबत ठेकेदारांना सूचना दिली. ते म्हणाले, “काम गतीने करण्यासाठी नियोजन करावे. काही समस्या, अडचणी येत असतील त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. अधिक वेगाने काम करून पूर्ण करण्यासाठी वेळेचेही नियोजन करा.”



