मुख्य बातमी

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज ‘सखी’ निवास; प्रवेश प्रक्रिया सुरू 

रत्नागिरी : नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातंर्गत ‘भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था (भाकर)’ संचलित ‘सखी निवास’ महिला वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी शहर व आजूबाजूच्या परिसरात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हे हक्काचे आणि सुरक्षित ठिकाण ठरणार आहे.

संपूर्ण इमारत २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असून चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात आहेत. महिलांसाठी अत्यंत शांत, प्रसन्न आणि स्वच्छ परिसर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था असून अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा आहे. तसेच २४ तास वीज पुरवठा आणि बॅकअपसाठी इन्व्हर्टरची उत्तम व्यवस्था आहे. जेवणासाठी स्वतंत्र आणि प्रशस्त हॉल असून, उत्तम दर्जाची मेस सुविधा उपलब्ध आहे. दर्जेदार व्यवस्था राखण्यासाठी वसतिगृहाची प्रवेश क्षमता मर्यादित ठेवण्यात आली आहे.

वसतिगृहाचा पत्ता गणेशनगर, कुवारबाव, आरटीओ रोड जवळ, ता. जि. रत्नागिरी – 415612 असून प्रवेशासाठी संपर्क (मोबाईल क्रमांक) 8379947498 व 7507795321 असा आहे. रत्नागिरी जिल्हा आणि परिसरात नोकरी करणाऱ्या गरजू महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि त्वरित आपल्या प्रवेशाची निश्चिती करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!