मुख्य बातमी

राजापूर नगरपालिकेसाठी तीन दिवसांत केवळ एकच अर्ज दाखल

आघाडीचे ठरले; युतीबाबत मात्र गुलदस्त्यात

राजापूर : राजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी आज तिसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, या तीन दिवसांत केवळ एकच प्राप्त झाला असून श्रीमती ज्योती सुनील खटावकर यांनी अपक्ष (हिंदू महासभा) म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत किती अर्ज दाखल होतात त्याकडे आता समस्त राजापूरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासहित एकूण दहा प्रभागातील २० जागांसाठी निवडणूक होणार आहे. राजापूरचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून त्या पदासाठी जोरदार चुरस पहावयास मिळत आहे. राजापूर शहरातील काही महिला नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून अखेरच्या क्षणी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीसाठी रिंगणात कोण उमेदवार राहतात त्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.

दहा प्रभागातून वीस जागांसाठी देखील मोठी चुरस निर्माण झाली आहे; मात्र उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असल्याने या दरम्यान किती उमेदवार नगराध्यक्ष पदासहित एकवीस जागांसाठी अर्ज दाखल करतात त्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!