बावीस खेडी बौद्धजन संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

आबलोली : बावीस खेडी बौद्धजन संघ, विभाग मुंबई या संस्थेच्या वतीने संस्थेमधील सदस्य, गावातील, मुंबईस्थित भावकीमधील मागील दोन वर्षांतील माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक शालांत या बोर्ड परीक्षा आणि पदविका व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
सुरुवातीला स्वागताध्यक्ष आयु. विजय पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. आयु. दीपक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांताक्रूझ येथील म्युनिसिपल हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सहसचिव आयु. दीपक जाधव व प्रास्ताविक सचिव आयु. दिलीप सावंत यांनी केले. संस्थेचे सभापती आयु. सुरेश जाधव, उपसभापती आयु. विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरक मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु. रोहित जाधव यांनी केले.



