आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात निवासी प्रशिक्षण उत्साहात

रत्नागिरी : येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘शेत-तळ्यातील मत्स्य संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. राज्य शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत अकोला (जि. अहिल्यानगर) येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेत-तळे बांधलेले आहेत. शेत-तळ्यातील पाण्याचा सिंचनासोबत मत्स्यशेतीसाठी उपयोग व्हावा म्हणून या प्रकल्पात सहभागी ३२ शेतकऱ्यांना ‘शेत-तळ्यातील मत्स्य संवर्धन’ या विषयी प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. शेखर कोवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी या प्रशिक्षणामध्ये संशोधनावर आधारित अभ्यासक्रम असल्याने त्याचा शेतकऱ्यांना नक्की उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी, प्रा. डॉ. आसिफ पागरकर, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम, अहिल्यानगरचे उप कृषी अधिकारी राजाराम साबळे, समशेरपूरचे मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर, राजूर (अहिल्यानगर) चे मंडळ कृषी अधिकारी यशवंत खोकले, अकोला येथील तंत्रज्ञान व्यवस्थापक बाळनाथ सोनावणे उपस्थित होते.

 

या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान “शेत-तळ्यातील मत्स्य शेती: सद्यस्थिती व भविष्य तसेच मत्स्य-शेती प्रकल्प अहवाल” याविषयी डॉ. केतन चौधरी यांनी, तर “माशांचे रोग व व्यवस्थापन” याविषयी डॉ. आसिफ पागरकर यांनी मार्गदर्शन केले. “मत्स्यशेत पूर्व तयारी तसेच माशांची वाढ व नोंदी” याविषयी प्रा. नरेंद्र चोगले, “माशांची बीज ओळख, वाहतूक व संगोपन” याविषयी डॉ. वैभव येवले, “जागेची निवड आणि तलाव बांधकाम” याविषयी डॉ. राकेश जाधव, “माशाच्या जाती” विषयी वर्षा सदावर्ते, तर “मत्स्य खाद्य व्यवस्थापन” विषयी अपूर्वा सावंत यांनी मार्गदर्शन केले. “मत्स्यशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन” यावर डॉ. हरीश धमगाये यांनी तर, “शेत-तळ्यातील पिंजरा मत्स्य संवर्धन” यावर कृपेश सावंत, “मासे काढणी” यावर सुशील कांबळे तर “काढणी पश्चात काळजी” यावर प्रा. सचिन साटम यांनी मार्गदर्शन केले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या लतिका गावडे, मत्स्य विकास अधिकारी आणि शिवराज चव्हाण, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी यांनी “महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य शेतीविषयक योजना” यावर, तर रत्नागिरीच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हर्षला पाटील यांनी “फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मत्स्य व्यवसायमध्ये कार्य” याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठाचे मोबाईल ॲपबाबत सर्व प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण-पूर्व आणि आणि प्रशिक्षण-पश्चात मूल्यमापन सुद्धा घेण्यात आले.

कार्यक्रमाचा निरोप समारंभावेळी संविधान दिन निमित्त कार्यक्रम अध्यक्ष डॉ. केतन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संविधान उद्देशिकेचे वाचन सर्व उपस्थितांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुळदे- कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन सावंत आणि रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर, प्रा. डॉ. आसिफ पगारकर आणि सहाय्यक संशोधन अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन साटम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच प्रशिक्षण पुस्तिका देण्यात आली. या प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. नितीन सावंत यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणातील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी यशस्वी मत्स्यशेती उद्योजक व्हावे, अशी आशा व्यक्त केली. सागर कुवेसकर यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना मत्स्य शेतकऱ्यांना मदत करण्यास मत्स्यव्यवसाय विभाग कायम तत्पर असेल अशी ग्वाही दिली.

डॉ. केतन चौधरी यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणात प्राप्त ज्ञान आणि कौशल्याचा वापर प्रत्यक्ष शेती करताना करावा आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ सोबत सतत संपर्क ठेवून समस्या सोडवण्याचे आवाहन केले. प्रशिक्षनार्थीनी प्रशिक्षण कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला आणि उत्तम प्रकारचे प्रात्यक्षिक सह सखोल मार्गदर्शन लाभले यानिमित्त आयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अपूर्वा सावंत यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन साटम यांनी केले.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. आसिफ पागारकर, अभिरक्षक प्रा. डॉ. हरिष धमगये, प्रा. नरेंद्र चोगले व सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, श्रीम. ए. एन. सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक रमेश सावर्डेकर, कार्यालय अधिक्षक, श्रीकांत तांबे, मत्स्यालय यांत्रिक मनीष शिंदे, वरिष्ठ लिपिक श्रीम. जे.जे. साळवी, महेश किल्लेकर, बोट चालक दिनेश कुबल, बोटमन सुहास कांबळे राजेंद्र कडव, शिपाई सचिन चव्हाण, मजूर प्रवीण गायकवाड, क्षेत्र संग्राहक, भूमी भाटकर तसेच तेजस जोशी, प्रशांत पिलणकर, योगेश पिलणकर, दर्शन शिंदे, अभिजित मयेकर, केतन चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!