क्रीडामुख्य बातमी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत १२ डिसेंबरपासून क्रीडा सप्ताहाचे आयोजन 

रत्नागिरी : क्रीडा संस्कृतीचा जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी तसेच खेळाडूंना प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने १२ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यामधील शाळा, महाविद्यालये व स्थानिक मैदाने येथे हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. सप्ताहादरम्यान जिल्ह्यात विविध क्रीडाविषयक उपक्रम होणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.

या उपक्रमांत कराटे प्रशिक्षण शिबिर, खो-खो प्रशिक्षण वर्ग, जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा, क्रीडा मैदान दौरे, योगासन वर्ग आदींचा समावेश असून विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन, सकस शारीरिक व्यायाम, क्रीडा शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

असे असेल क्रीडा सप्ताहाचे नियोजन : 

१२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ वाजता एकदिवसीय कराटे प्रशिक्षण वर्ग, फाटक हायस्कूल (रत्नागिरी). १२ ते १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ यावेळेत खो-खो प्रशिक्षण वर्ग, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर. १३ ते १४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा (पाली, ता. जि. रत्नागिरी). १५ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सावर्डे, डेरवण (ता. चिपळूण) येथे क्रीडा मैदान दौड. १२ ते १८ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सांयकाळी ५ ते ७ वाजता व्हॉलीबॉल प्रशिक्षण वर्ग. १२ ते १८ डिसेंबर रोजी योगा हॉल, शिवाजी स्टेडियम येथे सकाळी ७ ते ९ योगासन वर्ग. १२ ते १८ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथे सायंकाळी ६ ते ८ वाजता तायक्वांदो प्रशिक्षण वर्ग.

क्रीडाप्रेमींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!