मुख्य बातमी

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना

लाभ घेण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,कुवारबाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

केंद्र शासनाने २०१५ मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेमध्ये १.२५ लाख अनुसूचित जातीचे उद्योजक आणि १.२५ लाख महिला उद्योजिका आगामी ३ वर्षांत निर्माण करण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठरविलेले आहे. देशातील २७ सरकारी बँकांच्या १.२५ लाख शाखांच्या माध्यमातून १.२५ लाख अनुसूचित जातीचे उद्योजक आणि १.२५ लाख महिला उद्योजिका बनविण्याची जबाबदारी प्रत्येक बँकेच्या शाखेवर सोपविण्यात आली आहे.

लाभाचे स्वरूप

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत प्रकल्प मुल्याच्या ७५ टक्के बँकेकडील कर्ज मंजूर, प्रकल्प मुल्याच्या १० टक्के रक्कम अर्जदाराचा स्वहिस्सा, प्रकल्प मुल्याच्या १५ टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मार्जिन मनी स्वरूपात, कर्ज मर्यादा १० लाख ते १०० लाख असे लाभाचे स्वरूप आहे. यासाठी कोणताही मान्यताप्राप्त उद्योग, उत्पादन सेवा, कृषीपूरक / ट्रेडिंग आदी उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज प्रकरण मंजूर करणे आवश्यक आहे. योजनेबाबतचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!