रत्नागिरीतील श्री भगवती देवीच्या (किल्ला) शिमगोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा

रत्नागिरी : शहराजवळील किल्ला येथील श्री भगवती देवीच्या शिमगा उत्सवाची बैठक पार पडली. या बैठकीत शिमगा कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. या बैठकीला देवस्थानचे ट्रस्टी, कमिटी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२२ फेब्रुवारीला सकाळी देवीला रूपे चढविण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर निशाणी काठी उभी करण्यात येईल. दुपारी ३ वाजता श्री देवी भगवती मंदिर येथून निघेल. भागेश्वर मंदिर मार्गे, राम मंदिर मार्गे श्री देव भैरव याला हात भेट नारळ देऊन तेथून मुरलीधर मंदिर मार्गे झाडगांव नाका मार्गे जोगेश्वरी मंदिरामध्ये हात भेट देऊन तेथून झाडगांव नाका मार्गे, गाडीतळ मार्गे, श्री देवी नवलाई पावणाई मंदिरामध्ये हात भेट घेऊन, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथील श्री देव महापुरुष मंदिराला भेट देऊन तेथे गाऱ्हाणे घालून पुन्हा त्याच मार्गे परत ८ वाजता श्री भगवती देवी मंदिर येथे येईल.

२ मार्च रोजी होळीच्या दिवशी श्री भगवती देवी मंदिर (किल्ले रत्नागिरी) येथून दुपारी १.३० वाजता निघून भागेश्वर मंदिर, राममंदिर, मांडवी बंदर मार्गे, नेने वकील यांच्या घराजवळून सुदेश भालचंद्र मायनाक (मांडवी) यांच्या घरी जाईल येथून होळी तोडून भुते नाका मार्गे मुरलीधर मंदिर जागेत जाईल. तेथून होळी तोडून परत भैरी मंदिर मार्गे मुरलीधर मंदिर मार्गे, सुबेदार नाका [चरकरवाडी] भैरव मंदिर / चरकर होळ देव मार्गे, राम मंदिर मार्गे भागेश्वर मंदिर मार्गे श्री भगवती मंदिर येथे ११ वाजता येईल. त्यानंतर होम होईल.
३ मार्च रोजी धुळवळीच्या दिवशी दुपारी १.३० ते रात्री ८ यावेळेत श्री भगवती मंदिर, भागेश्वर मंदिर, पेठकिल्ला, राममंदिर पेठकिल्ला, चरकर होळदेव, भैरव मंदिर, काँग्रेसभवन, टिळक आळी मार्गे, झाडगांव नाका (श्री. सावंत यांचे घरी) जोगेश्वरी मंदिर येथून काँग्रेस भवन, मुरलीधर मंदिर, भैरव मंदिर, राम मंदिर, भागेश्वर मंदिर मागें, भगवती मंदिर येथे येईल.
अशाप्रकारे श्री भगवती देवी मंदिर देवस्थान, किल्ला यांचा शिमगा उत्सव साजरा होणार आहे.



